Vitthal Mandir : अधिक मासानिमित्ताने विठ्ठलाच्या दर्शनाची वेळ वाढवली

Vitthal Mandir : अधिक मासानिमित्ताने विठ्ठलाच्या दर्शनाची वेळ वाढवली

दर तीन वर्षातून एकदा येणाऱ्या अधिक मासाच्या निमित्ताने पंढरीत भाविकांची गर्दी वाढू लागली आहे.
Published by  :
Siddhi Naringrekar

अभिराज उबाळे, पंढरपूर

दर तीन वर्षातून एकदा येणाऱ्या अधिक मासाच्या निमित्ताने पंढरीत भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. भाविकांना विठुरायाचे सुलभ दर्शन घेता यावे यासाठी मंदिर समितीने दीड ते दोन तासांनी दर्शनाची वेळ वाढवली आहे. या वाढीव वेळेमुळे अधिकाधिक भाविकांना दर्शनाचा लाभ होत आहे. इतर वेळी मंदिर रात्री साडेदहा वाजता बंद केले जाते, मात्र अधिक मास सुरू झाल्यापासून रात्री साडेबारा वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अधिक - श्रावण महिन्यातील आज पहिला सोमवार असल्याने पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात भाविकांची गर्दी झाली आहे. अधिक महिना पवित्र काळ समजा जातो. या महिन्यामध्ये चंद्रभागा स्नान आणि विठ्ठल दर्शन‌ महत्वाचे मानले जाते. अधिक श्रावण असल्याने आज पहाटे पासूनच भाविकांची दर्शनासाठी रीघ लागली आहे. दर्शनाची रांग मंदिरा पासून एक किलोमीटर अंतरावर गेली आहे. त्यामुळे दर्शनासाठी पाच ते सहा तासांचा कालावधी लागत आहे. याकाळात अधिकाधिक भाविकांना विठुरायाचे सुलभ दर्शन घेता यावेसाठी दर्शनाची सुमारे दीड ते दोन तासांनी वेळ वाढविण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.‌

असा आहे देवाचा नित्योपचार

अधिक मासाच्या निमित्ताने पहाटे चार वाजता मंदिर उघडले जाते. पहाटे चार ते सव्वा चार काकड आरती, पहाटे 4.15 ते 5.15 नित्य पूजा, सकाळी 10.45 ते 11 महानैवद्य, दुपारी 4.30 ते 5 पोषाख, सायंकाळी 6.45 ते 7 धुपारती,रात्री 12 नंतर शेजारती.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com