पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्या वरून संघर्ष; जय भगवान महासंघाच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्या वरून संघर्ष; जय भगवान महासंघाच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

एकीकडे मुंबईमध्ये दसरा मेळाव्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात संघर्ष सुरू असताना आता बीडमध्ये भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आणि भगवान गड दसरा मेळावा कृती समितीत संघर्ष सुरू झालाय.
Published by :
Siddhi Naringrekar

विकास माने, बीड

एकीकडे मुंबईमध्ये दसरा मेळाव्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात संघर्ष सुरू असताना आता बीडमध्ये भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आणि भगवान गड दसरा मेळावा कृती समितीत संघर्ष सुरू झालाय. या संघर्षाचा परिणाम म्हणजे जय भगवान महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्यास सुरुवात केलीय.

भगवान गडावर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना महंत नामदेव शास्त्री महाराज यांनी राजकीय भाषण करण्यास विरोध केला होता. आता त्याच भगवान गडाच्या पायथ्याशी मेळावा घेण्यासाठी भगवानगड दसरा मेळावा कृती समितीने पुढाकार घेतलाय. त्यामुळे अनेक वंजारी समाजातील बांधव नाराज असल्याचं पाहायला मिळतंय. जय भगवान महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी पुढाकार घेऊन समिती स्थापन केलीय. आणि याच माध्यमातून भगवानगडावर दसरा मेळावा होणार आहे.

त्यामुळे आता पंकजा मुंडे आणि या समितीत संघर्ष सुरू झालाय. दसरा मेळावा एकच होईल समाजात फूट पाडण्याचं काम करू नये, अशा भावना व्यक्त करून जय भगवान महासंघाच्या आष्टी येथील सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिलाय. त्यामुळे आता हा संघर्ष आणखी पेटण्याची चिन्ह निर्माण झाली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com