Pankaja Munde : वडिलांना दिलेल्या 'त्या' वचनाबद्दल सांगताना पंकजा मुंडे भावूक, म्हणाल्या की...
आज लातूरमध्ये माजी केंद्रीय मंत्री दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचे आले. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे उपस्थितीत होत्या. यावेळी पंकजा मुंडे यांनी भाषण केले आणि आपल्या वडिलांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. गोपीनाथ मुंडे यांची राजकारणाबाबत असलेल्या दूरदृष्टीबाबात त्यांनी भाष्य केले. तसेच निधनांच्या आधी वडिलांनी घेतलेल्या वचनाबाबत पंकजा मुंडेंनी भाष्य केले आहे.
काय बोलल्या पंकजा मुंडे?
आज माझ्या वडिलांच्या पुतळ्याचे अनावर आहे. त्यांची आणि काम करण्याची पद्धत वेगवेगळी आहे. ही गोष्ट मी मान्य करते. गोपीनाथ मुंडे यांनी मला हजारवेळा सांगितेल आहे की, तुला गोपीनाथ मुंडे व्हायचं असेल सुधारित आवृत्ती असली पाहिजे. म्हणूनच मी माझ्या तत्वांशी, सामान्य माणसांच्या हिताशी प्रतारणा न करता आपला स्वाभिमान गहाण न ठेवण्याचं मी माझ्या वडिलांचे निधन होण्याआधी वचन दिले होते. या वचनावर मी शेवटच्या क्षणापर्यंत मी काम करत राहील,असं वचनही पंकजा मुंडे यांनी जनतेला दिले.