Beed Pankaja Munde : आजूबाजूला शेतकऱ्यांचा घेराव अन् ... बीडमध्ये पूरग्रस्त भागात पंकजा मुंडेंचं बाजावर बसून जेवण; सोशल मीडियावर चर्चेचं वादळ
थोडक्यात
पंकजा मुंडे बीडमधील पूरग्रस्त भागात पाहणी दौऱ्यावर
पंकजा मुंडेंच नागरिकांना आश्वासन
पंकजा मुंडे यांनी पूरग्रस्त भागात बाजावर बसून जेवण केलं.
महाराष्ट्रात पावसाने थैमान घातलं असून अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अतिवृष्टीमुळे द्राक्ष बागा, कांदा आणि सोयाबीनच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर मंत्री पंकजा मुंडेआज बीड जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील पाहणी दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज बीडच्या गेवराई तालुक्यातील धोंडराई येथे पूरग्रस्त भागाची पाहणी केली.
बीडच्या गेवराई तालुक्यातील धोंड्राई परिसरात विद्रुप नदीला आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यानंतर त्या हिरापूर येथील पूरग्रस्त भागाची पाहणी करत होत्या. यावेळी पूरग्रस्त भागात पाहणी करत असताना त्यांनी थेट बाजावर बसून जेवण केलं. या त्यांच्या साधेपणाने पूरग्रस्त भागातील नागरिकही भारावले. दरम्यान सरकार तुमच्यासोबत आहे. भरीव मदत करण्यात येईल. असं आश्वासन यावेळी पंकजा मुंडे यांनी नागरिकांना दिले..
पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या की, या गावाची जी परिस्थिती आहे ती अजून इतर गावांची असणार, त्यासाठी या गावांच पुनर्वसन करण्याची गरज आहे. या संदर्भात मी नक्की मुख्यमंत्री आणि वित्तमंत्र्यांना निवेदन करेन आणि नक्कीच ते करुनही आणेण कारण, असे अनेक गाव असतील ज्यांच पुनर्वसन केलं तर ते गाव धोक्यात येणार नाही. अशी परिस्थिती पुन्हा येऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करु. आता सध्या मी पाहणी करत आहे, तर माझी एवढीच मागणी आहे की, या पाहणी मध्ये लोक जी आहेत त्यांनी आम्हाला नुकसान काय झालं आहे ते बघू द्याव.