बातम्या
घरात पाणी देणारा नेता पाहिजेत की घरात चपटीची बॉटल देणारा नेता पाहिजे; पंकजा मुंडेंचा निशाणा कुणावर?
बीडच्या परळी येथील कौठळी गावात जल जीवन मिशन योजनेचा शुभारंभ सोहळा पंकजा मुंडे यांच्या हस्ते पार पडला.
बीडच्या परळी येथील कौठळी गावात जल जीवन मिशन योजनेचा शुभारंभ सोहळा पंकजा मुंडे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवर चांगलाच हल्लाबोल केला आहे.
पंकजा मुंडे म्हणाले की, तुम्हाला नेमका कसा नेता पाहिजे तर तुम्हाला भूषण वाटावे अशा नेतृत्वाची गरज आहे. पुढची पिढी घडवणारा नेता पाहिजे की,पुढची पिढी वाया घालवणार नेता पाहिजे. घरा घरात पाणी देणारा नेता पाहिजेत की घरा घरात चपटीची बॉटल देणारा नेता पाहिजे. असा सवाल पंकजा मुंडेंनी विचारला. आणि नाव न घेता धनंजय मुंडेंवर टीका केली.
तसेच चारित्र्यहीन व्यक्ती राजकारणातली व्हिलन असते. मुंडे साहेबांच्या नंतर तुम्ही सगळे कोणाचं नाव घेता माझं, कारण तुम्हाला कुशल अन् चांगला नेता तुम्हाला पाहिजे. असे पंकजा मुंडे म्हणाले.