Admin
बातम्या
मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट ७ दिवस वाहतुकीसाठी बंद
आजपासून तीन दिवस मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
आजपासून तीन दिवस मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण नजीक आहे परशुराम घाट आहे. दुपारी 12 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत याची वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
लहान वाहनांसाठी पिरलोटे - चिरणी - आंबड्स पर्यायी मार्ग ठेवण्यात आला आहे. अवजड वाहतूक दिवसभर बंद राहणार आहे. 27 मार्च ते 3 एप्रिलपर्यंत परशुराम घाट दिवसा वाहतुकीसाठी बंद ठेवला आहे.
या कालावधीत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात यावा अशी मागणी करणारे पत्र राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाने या संदर्भात पोलीस प्रशासन, उपप्रादेशिक विभाग आणि चिपळूण महसूल विभाग यांच्याकडून अहवाल मागवला आहे.