परशुराम घाट आजपासून 16 दिवसांसाठी पाच तास बंद; पर्यायी वाहतूक मार्ग जाणून घ्या
Admin

परशुराम घाट आजपासून 16 दिवसांसाठी पाच तास बंद; पर्यायी वाहतूक मार्ग जाणून घ्या

परशुराम घाट आजपासून इतक्या दिवसांसाठी पाच तास बंद

परशुराम घाट आजपासून 16 दिवसांसाठी पाच तास बंद राहणार आहे. बंद कालावधी हलक्या वाहनांची पर्यायी वाहतूक कळंबस्ते-आंबडस-चीरणी मार्गे वळवण्यात येणार आहे. घाटातील रुंदीकरण आणि उर्वरित कामं पूर्ण करण्यासाठी वाहतूक काही ठराविक वेळेत बंद राहणार आहे. 25 एप्रिलपासून 10 मेपर्यंत दुपारी 12 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत घाटातील वाहतूक पूर्णत: बंद राहणार असल्याची माहिती मिळते आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण नजीकच्या परशुराम घाटाचं चौपदरीकरणाचं काम सुरु आहे. परशुराम घाटातील वाहतूक दोन आठवडे ठराविक वेळेत बंद राहणार आहे. येत्या 25 एप्रिल ते दहा मेपर्यंत हा घाट, या घाटातील वाहतूक ठराविक वेळेत दुपारी 12 ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत पूर्णतः बंद करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील चौपदरीकरणाचे काम महत्त्वाच्या टप्प्यावर आलं असल्यानं पावसाळ्यापूर्वी काम मार्गी लावायचे आहे. म्हणून आजपासून म्हणजेच, 25 एप्रिल 2023 पासून परशुराम घाटातील वाहतूक दोन आठवडे ठराविक वेळेत बंद राहणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com