“तेलंगणामध्ये काँग्रेसच्याच एका नेत्याकडे कोरटकर लपून होता"; परिणय फुके यांचा गंभीर आरोप

प्रशांत कोरटकरला तेलंगणातून अटक केली आली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

प्रशांत कोरटकर याने इंद्रजित सावंत यांना धमकी देताना छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. प्रशांत कोरटकर याचा गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस शोध घेत होते. अखेर काल प्रशांत कोरटकरला तेलंगणातून अटक करण्यात आली आहे.

याच पार्श्वभूमीवर आता प्रशांत कोरटकरच्या अटकेवरुन भाजप आमदार परिणय फुके यांनी गंभीर आरोप केला आहे. परिणय फुके म्हणाले की, “तेलंगणामध्ये काँग्रेसच्याच एका नेत्याकडे कोरटकर लपून होता. कोरटकरला वाचवण्याचं काम काँग्रेसनेच केलं. हे स्पष्ट झालेलं आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com