Parineeti Chopra, Raghav Chadha
Parineeti Chopra, Raghav Chadha Team Lokshahi

Parineeti-Raghav Engagement : राघव चड्ढा-परिणीती चोप्रा यांचा 'या' खास पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडणार साखरपुडा

गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि ‘आप’चे खासदार राघव चड्ढा सतत चर्चेत आहेत. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे एकमेकांना डेट करत आहेत

गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि ‘आप’चे खासदार राघव चड्ढा सतत चर्चेत आहेत. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे एकमेकांना डेट करत आहेत. या जोडप्याने अद्याप त्यांच्या नात्याची पुष्टी केली नसली तरी त्यांना अनेक प्रसंगी एकत्र पाहिले गेले आहे. त्यांच्या साखरपुड्याच्या अगोदर, ते दिल्लीत एकत्र दिसले होते. विमातळावरील परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचे फोटो पाहून असा अंदाजा लावला जात होता की, हे साखरपुड्यासाठी दिल्लीकडे रवाना झाले होते.

आज परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा साखरपुडा हा दिल्लीमध्ये पार पडणार आहे. रिपोर्टनुसार 150 लोकांच्या उपस्थितीत परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा साखरपुडा पार पडणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चाहते यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत. शेवटी आज तो दिवस आला आहे.

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या साखरपुड्याला अनेक नेते आणि बाॅलिवूड कलाकार हजेरी लावणार आहेत. यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबची मुख्यमंत्री भगवंत मान, परिणीती चोप्रा हिची बहीण प्रियांका चोप्रा तसेच बाॅलिवूडचे अनेक कलाकार. आम आदमी पक्षाचे जवळपास सर्वच नेते या साखरपुड्यासाठी हजर असतील असे देखील सांगितले जात आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com