Parth Pawar Land Scam : पार्थ पवार जमीन प्रकरण; मुख्य सचिवांचा अहवाल Lokशाही मराठीच्या हाती, अहवालात काय?
कोरेगाव पार्क मधील जमीन व्यवहार प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्थ पवार यांच्यामुळे चर्चेत आलेली खरेदीदार कंपनी अमेडिया इंटरप्राइजेस एल. एल. पी. चे भागीदार दिग्विजय अमरसिंह पाटील, जमीन विक्री बाबत कुलमुख्यातपत्र असणारी महिला शीतल तेजवानी आणि निलंबित सह दुय्यम निबंधक आर. बी. तारु यांच्यावर बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
मात्र यात पार्थ पवार यांचं नाव नसल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान पार्थ पवार यांच्या जमिन घोटाळ्याप्रकरणी मुख्य सचिवांचा अहवाल लोकशाही मराठीच्या हाती लागला आहे. अमेडीया कंपनी आणि शितल तेजवानीनं मिळून शासनाची फसवणूक केल्याचा ठपका त्यांच्यावर लावण्यात आला आहे.
यातील दिग्विजय अमरसिंह पाटील हा पार्थ पवारांचा व्यवसायिक भागिदार आणि सुनेत्रा पवारांचा भाचा आहे. जर एका व्यवसायिक भागीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला, तर दुसरा भागिदार असलेल्या पार्थवर गुन्हा का नाही? असा प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता वर्तावली जात आहे.
