Sanjay Raut : निवडणूक आयोग आणि भाजपची पार्टनरशिप!  संजय राऊतांचा गंभीर आरोप

Sanjay Raut : निवडणूक आयोग आणि भाजपची पार्टनरशिप! संजय राऊतांचा गंभीर आरोप

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत भाजप आणि निवडणुक आयोगावर गंभीर टीका केली आहे.
Published by :
Prachi Nate
Published on

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होतील. याचपार्श्वभूमिवर मविआ आणि मनसेकडून महायुती आणि निवडणूक आयोगावर प्रश्नांची झोड मारली जात आहे. विधानसभा निवडणुकांच्या वेळेस मतचोरी आणि बनाव मतदार यादीवर मविआ आणि मनसे नेत्यांकडून पत्रकार परिषद देखील घेण्यात आली.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत भाजप आणि निवडणुक आयोगावर गंभीर टीका केली आहे. यावेळी संजय राऊत म्हणाले होती की, निवडणूक आयोग-भाजपची पार्टनरशिप आहे. निवडणूक आयोग आणि भाजपची पार्टनरशिप असल्याचा संजय राऊत यांनी आरोप केलाय.फेक नरेटिव्ह भाजपनेच सुरु केला असा पलटवारही संजय राऊत यांनी केला. तर बेलापूर,पैठण,बुलढाण्यात बोगस मतदार असल्याचं सत्ताधारीच बोलले,असंही राऊत म्हणालेत.

"महायुतीचा महराष्ट्रात विजय झालेला नसून मतचोरीच्या माध्यमांतून घोटाळ्यांच्या माध्यमांतून हा विजय प्राप्त केलेला आहे. नरेटिव्ह सेट करण हा एक राजकीय भाग आहे. तुम्ही एतकी वर्ष काय केल? नरेटिव्ह फेक नसतो, पण फेक नरेटिव्ह हा भाजपने अमलात आणला. तुम्ही मतदार यादीत केलेले घोटाळे आम्ही पुराव्यांसह समोर आणले आहेत".

"आम्ही निवडणुक आयोगाला प्रश्न विचारत आहोत, त्यामुळे निवडणुक आयोगाने आम्हाला उत्तर द्याव. निवडणुक आयोगाने भाजपच्या नेत्यांना वकील म्हणून नेमलं आहे की? निवडणुक आयोग आणि भाजपनेते हातात हात घालून काम करतात, त्यांच्यात पार्टनरशिप आहे आणि त्याच जोरावर भाजपने विधानसभेत विजय मिळवला."

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com