Mumbai Local Accident : मुंबई लोकलच्या मध्य रेल्वे मार्गावर मोठा,  3 प्रवाशांचा जागीच मृत्यू  मृत्यू

Mumbai Local Accident : मुंबई लोकलच्या मध्य रेल्वे मार्गावर मोठा, 3 प्रवाशांचा जागीच मृत्यू मृत्यू

स्जीद बंदर रेल्वे स्थानकात प्रवासी पडले, घटनेत तीन जणांचा मृत्यू
Published by :
Varsha Bhasmare
Published on

थोडक्यात

  • मस्जीद बंदर रेल्वे स्थानकात प्रवासी पडले

  • 3 ते 4 प्रवीसी मस्जीद बंदर रेल्वे स्थानकात पडले

  • गर्दीमुळे 3 ते 4 प्रवासी पडले

मुंबई लोकलच्या मध्य रेल्वे मार्गावर मोठा अपघात झाला आहे. सँडहर्स्ट रोड स्टेशनवर लोकलने 4 प्रवाशांना उडवलं असल्याची माहिती समोर आली आहे. यात 3 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. रेल्वे आंदोलनामुळे हे प्रवासी रुळावरून चालले होते, त्यावेळी अंबरनाथ फ़ास्ट लोकलने रेल्वे रुळावरून चालणाऱ्या प्रवाशांना उडवलं, यात तिघांचा मृत्यू झाला आहे. मात्र रेल्वेने याबाबत अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.

गर्दीमुळे चार प्रवासी धावत्या लोकलमधून खाली पडल्याची धक्कादायक घटना घडली असून एकाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. ट्रेनमधून खाली पडलेल्या प्रवाशांना जे.जे. रुग्णालयात उपाचारासाठी दाखल करण्यात येत असल्याची प्राथमिक माहिती आहे. मस्जिद आणि  सीएसएमटी (Mumbai) रेल्वे मार्गावर हा अपघात झाल्याचे समजते.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com