Pathaan Movie
Pathaan MovieTeam Lokshahi

पठाण चित्रपट प्रदर्शित; बजरंग दलाच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर थेटर बाहेर पोलीस बंदोबस्तात वाढ

सांगलीत आज प्रदर्शित होत असणाऱ्या पठाण चित्रपटाला बजरंग दलाने विरोध दर्शवला आहे.

संजय देसाई, सांगली

सांगलीत आज प्रदर्शित होत असणाऱ्या पठाण चित्रपटाला बजरंग दलाने विरोध दर्शवला आहे. सांगलीत बजरंग दलाने औरंम चित्रपटगृहाला निवेदन देऊन चित्रपट प्रदर्शित करू नये अशी विनंती केली आहे. त्यातच एस आर के ह्या अभिनेता शाहरुख खान यांच्या फॅन क्लबने विजयनगर येथील औरम थिएटरच बुक केल आहे.

110 तिकीट बुक केले आहेत. यावेळी चाहत्यांनी केक कापून जल्लोष साजरा केला यावी थेटर च्या बाहेर आणि थेटर च्या आत मध्ये पिक्चर पाहण्यास गर्दी केली होती..राज्यभराप्रमाणे आज सांगलीतील पठाण चित्रपट प्रदर्शित झाला आहे. मात्र या चित्रपटाला विरोध होण्याच्या शक्यतेने पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. सकाळी नऊ पंचेचाळीस वाजता विजयनगर येथील ओरम चित्रपटगृहात पठाण चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

हा चित्रपट भारताव्यतिरिक्त स्पेन, यूएई, तुर्की, रशिया, सायबेरिया, इटली, फ्रान्स आणि अफगाणिस्तान या देशांमध्ये या चित्रपटाचं चित्रीकरण झाले आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलगू या भाषेंमध्ये प्रदर्शित होणार आहे. सिद्धार्थ आनंदने या सिनेमाच्या दिग्दर्शन केलं आहे. शाहरुखसोबतच पठाण चित्रपटात दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत.


logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com