धावत्या रेल्वेपासून वेगळं झालं इंजिन अन् दोन डबे;  जळगावात पाटलिपूत्र एक्सप्रेसचा मोठा...

धावत्या रेल्वेपासून वेगळं झालं इंजिन अन् दोन डबे; जळगावात पाटलिपूत्र एक्सप्रेसचा मोठा...

मुंबईकडून भुसावळकडे जात असताना पाटलिपूत्र एक्सप्रेसचे चाळीसगाव नजीक वाघळी रेल्वे स्थानकाजवळ या धावत्या एक्सप्रेसचे कपलिंग निघाल्यामुळे इंजिनसह दोन डबे हे अचानक वेगवेगळे झाले.
Published by :
Sudhir Kakde

जळगाव | मंगेश जोशी : जिल्ह्यातील चाळीसगाव जवळील वाघळी गावाजवळ धावत्या एक्सप्रेसचे इंजिनसह दोन डबे हे वेगळे झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही मात्र सदर प्रकारामुळे प्रवाशांमध्ये मात्र खळबळ उडाली होती. गाडी नंबर १२१४१ लोकमान्य टिळक टर्मिनस पाटलीपुत्र एक्सप्रेस (Patliputra Express) ही मुंबईकडून भुसावळकडे जात असताना चाळीसगाव (Chalisgaon) नजीक वाघळी रेल्वे स्थानकाजवळ या धावत्या एक्सप्रेसचे कपलिंग निघाल्यामुळे इंजिनसह दोन डबे हे अचानक वेगवेगळे झाले. व त्यामुळे प्रवाशांची एकाच धावपळ उडाली. घटनेची माहिती मिळाल्यावर या ठिकाणी खळबळ उडाली रेल्वे सुरक्षा बल (RPF) व रेल्वे विभागाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर पुन्हा डबे सोडून पुढे गेलेले इंजिन व दोन डबे हे परत मागे आणण्यात येऊन डब्यांना जोडण्यात आले.

या घटनेनंतर एक्सप्रेसमधील नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले होते. सर्व नागरिक डब्यांच्या बाहेर पडले. व रेल्वे रुळावर गर्दी केली. घटनेत प्रत्यक्षदर्शी नागरिकांच्या मिळालेल्या माहितीनुसार कुठलीही दुर्घटना अथवा जीवितहानी किंवा कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडलेला नाही. दरम्यान घटनेची माहिती मिळतात रेल्वे विभागाचे अधिकारी हे घटनास्थळी दाखल झाले व तातडीने ही पाटलीपुत्र एक्सप्रेस जोडून भुसावळ कडे रवाना करण्यात आली भुसावळ रेल्वे स्थानकावर या गाडीचे संपूर्ण निरीक्षण करून ही गाडी पुढे मार्गस्थ करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे विभागाने दिली आहे. आधीच उशिरा धावत असलेली ही गाडी मात्र या प्रकारामुळे अजून काही काळ विलंबाने धावणार असल्याने प्रवाशांना मात्र मनस्ताप सहन करावा लागत आहे

धावत्या रेल्वेपासून वेगळं झालं इंजिन अन् दोन डबे;  जळगावात पाटलिपूत्र एक्सप्रेसचा मोठा...
'गुस्ताख-ए-नबी की सजा...'; रेल्वे रुळावर मृतदेह सापडलेल्या तरुणाच्या कुटुंबाला धक्कादायक मेसेज

एकाच दिवसात रेल्वेचे दुसरे संकट टळले

मंगळवारी पहाटे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकावर हार्बर लाइन वरील एका लोकलचा डबा प्लॅटफॉर्मवर घसरला होता. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही, तर दुपारच्या सुमारास मुंबईकडून पाटलीपुत्र कडे जाणाऱ्या धावत्या पाटलीपुत्र एक्सप्रेस चे दोन डबे हे कपलिंग निघाल्याने वेगळे झाले . याही ही घटनेत सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नसल्याने रेल्वेचे एकच दिवसात हे दुसरे संकट टळले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com