Gujrat Rajkot Fire Incident
Gujrat Rajkot Fire Incident

गुजरातच्या राजकोटमध्ये आगडोंब! गेमिंग झोनमध्ये लागली भीषण आग, २४ जणांचा मृत्यू

जरातच्या राजकोटमधील एका गेमिंग झोनमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडलीय. या आगीत २४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय.
Published by :

Gujrat Rajkot Gaming Zone Fire : गुजरातच्या राजकोटमधील एका गेमिंग झोनमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडलीय. या आगीत २४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय. मृतांमध्ये ११ लहान मुलांचा समावेश आहे. आगीच्या घटनेची माहिती मिळताच रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचली आहे. अग्निशामक दलाकडून आगीवर नियंत्रण आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे. आगीत जखमी झालेल्या नागरिकांवर तातडीनं उपचार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यांनी महानगरपालिका आणि संबंधीत अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

राजकोटचे पोलीस आयुक्त राजू भार्गवा यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं, रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात येत आहे. आगीत मरण पावलेल्यांचे मृतदेह काढण्याचे काम सुरु आहे. आतापर्यंत २० जणांचा मृतदेह बाहेर काढले असून पुढील तपासासाठी हे मृतदेह रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com