Raj Thackeray : राज ठाकरेंच लोढांना प्रखट उत्तर" मी त्यांचं समर्थन करत नाही, तर...'

राज ठाकरेंची मंगलप्रभात लोढांवर टीका: 'लोढा कोणत्याही समाजाचे मंत्री नाहीत, ते राज्याचे मंत्री आहेत.'
Published by :
Riddhi Vanne

Raj Thackeray On Mangal Prabhat Lodha : मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महानगरपालिकेने दादरमधील कबुतरखान्यावर कारवाई करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर जैन समाजाने या गोष्टीला विरोध दर्शवला. दरम्यान ६ ऑगस्टला जैन समाजाने आंदोलन करत पालिकेने लावलेली ताडपत्री हटवली होती. त्यानंतर जैन समाजाच्या जैन मुन्नी यांनी शस्त्र उचलण्याची भाषा केली. यानंतर वातावरण चांगलचं तापलं. दरम्यान काल लोकशाही मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी सर्व गोष्टीचे स्पष्टीकरण दिले. मनसेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी कबूतरखाना प्रकरणावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांच्यावर जोरदार टीका केली. "लोढा-बिढा सारख्या लोकांचे हस्तक्षेप असं शंभर वेळा होईल, पण मंगलप्रभात लोढा कोणत्याही समाजाचे मंत्री नाहीत, ते एक राज्याचे मंत्री आहेत," असं राज ठाकरे म्हणाले. दरम्यान मंगलप्रभात लोढांनी राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले आहे.

काय दिलंय लोढा यांनी प्रत्युत्तर

"राज ठाकरे यांनी कबूतरखानाच्या प्रकरणावर बोलताना जैन मुनी निलेशचंद्र विजय यांच्या संदर्भात माझं नाव घेतलं. परंतु मी त्यांच्याशी सहमत नाही. मी जैन मुनी निलेशचंद्र विजय यांच्या भाषाशास्त्राशी सहमत नाही. मी त्यांच्यासाठी नाही, पण त्यांचं भाषाशास्त्र स्वीकारणं योग्य नाही."कायदा हातात घेणं योग्य नाही. कोर्टाचे आणि प्रशासनाचे आदेश पाळूनच कार्य करायला हवे." तसेच, त्यांनी राज ठाकरे आणि जैन समाज दोन्ही बाजूंना सूचित केलं की, "तुम्ही दोघांनीही मर्यादित राहून आपली भूमिका मांडावीत. कायदा आणि न्यायालयाचे आदेश पाळले पाहिजेत," कुठलाही विवाद न वाढवता आणि कायद्याचे उल्लंघन न करता कार्य करणे आवश्यक आहे".

राज ठाकरे यांनी मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यावरही टीका केली. "लोढा आणि बिढा सारखी माणसं दरम्यान हस्तक्षेप करत असतात, पण मंगलप्रभात लोढा कोणत्याही समाजाचे मंत्री नाहीत, ते एक राज्याचे मंत्री आहेत," असं राज ठाकरे म्हणाले. तसेच, "मंगलप्रभात लोढा यांनी न्यायालयाच्या निर्णयाचा आदर केला पाहिजे," असेही राज ठाकरे यांनी नमूद केले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com