Phaltan Doctor Case : शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) गटाच्या नेत्या पीडित कुटुंबियांच्या भेटीला
थोडक्यात
फलटणमध्ये एका तरुण महिला डॉक्टरने आत्महत्या केल्यानं राज्यभरात खळबळ उडाली आहे.
आज सुषमा अंधारे यांनी पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली.
राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी एकत्र संपदा मुंडेंच्या कुटुंबियांची सांत्वनपरभेट घेतली.
फलटणमध्ये एका तरुण महिला डॉक्टरने आत्महत्या केल्यानं राज्यभरात खळबळ उडाली आहे. ही डॉक्टर फलटणमधील एका खासगी रुग्णालयात कार्यरत होती. तिने हॉटेलच्या खोलीत गळफास घेऊन आयुष्य संपवलं. मृत्यूपूर्वी तिच्या तळहातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये तिने निलंबित पीएसआय गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर या दोघांवर अत्याचार आणि छळाचे गंभीर आरोप केले आहेत.
बदने याने अत्याचार केला, तर बनकर याच्याकडून सातत्याने मानसिक आणि शारीरिक छळ होत असल्याचे तिने नमूद केले. हे प्रकरण आता राजकीयवर्तूळात देखील खळबळ माजवत आहेत. या प्रकरणावर शिवसेना ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे अॅक्शन मोडवर आल्या आहेत. आज सुषमा अंधारे यांनी पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी तिथे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी एकत्र संपदा मुंडेंच्या कुटुंबियांची सांत्वनपरभेट घेतली.
