KKR vs LSG, IPL 2024
KKR vs LSG, IPL 2024

IPL च्या मेजवानीत 'सॉल्ट'चा तडका! फिलिपच्या वादळी खेळीमुळं KKR चा लखनौवर रोमहर्षक विजय

लखनौ सुपर जायंट्सने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत ७ विकेटस् गमावून कोलकाताला १६१ धावांचं आव्हान दिलं होतं.
Published by :

KKR vs LSG, IPL 2024 : आयपीएलचा २८ वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात ईडन गार्डनमध्ये रंगला. लखनौ सुपर जायंट्सने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत ७ विकेटस् गमावून कोलकाताला १६१ धावांचं आव्हान दिलं होतं. त्यानंतर या धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या कोलकाता नाईट रायडर्सने या सामन्यात एकतर्फी विजय मिळवला.

कोलकाताचा सलामीचा फलंदाज फिलिप सॉल्टने धडाकेबाज फलंदाजी करुन ४७ चेंडूत नाबात ८९ धावा केल्या. १४ चौकार आणि ३ षटकारांच्या जोरावर सॉल्टने नाबाद अर्धशतकी खेळी केली. त्यामुळे कोलकाताचा विजयाचा मार्ग सुकर झाला आणि ८ विकेट्स राखून कोलकाताने लखनौचा पराभव केला. कर्णधार श्रेयस अय्यरनेही सावध खेळी करत ३८ चेंडूत ३८ धावा केल्या.

लखनौसाठी डिकॉक (१०), कर्णधार के एल राहुल (३९), आयुष बदोनी (२९), निकोलस पूरन (४५) धावांची खेळी केली. केकेआरच्या गोलंदाजांनी लखनौच्या इतर फलंदाजांना स्वस्तात माघारी पाठवलं. मिचेल स्टार्कने ३ विकेट्स घेण्याची चमकदार कामगिरी केली. सुनील नरेन, चक्रवर्ती, आंद्रे रसल आणि वैभव अरोराला प्रत्येकी एक विकेट मिळाली. तर लखनौसाठी मोहसीन खानने २ विकेट घेतल्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com