ताज्या बातम्या
स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर अत्याचार; आरोपीच्या डीपीवर आमदाराचा फोटो
पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकात 26 वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये अत्याचार झाल्याची घटना घडली.
पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकात 26 वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये अत्याचार झाल्याची घटना घडली. पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून यावरुन आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया समोर येत आहे.
याच पार्श्वभूमीवर आता एक नवी माहिती समोर येत आहे. स्वारगेट प्रकरणातील आरोपीच्या डीपीला आमदाराचा फोटो असल्याचे पाहायला मिळत आहे. यावरुन आता चर्चा रंगल्या आहेत.
यावर आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत असून शिरुरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माऊली कटकेंचा फोटो दत्ता गाडेच्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर असल्याचे पाहायला मिळत आहे. यासोबतच आरोपी हा स्वत:ला आमदाराचा कार्यकर्ता आहे असे म्हणून गावात फिरायचा अशी माहिती मिळत आहे.