Waqf नंतर आता ख्रिश्चनांना केलं जातयं लक्ष्य; मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांचा संघ परिवारावर आरोप

Waqf नंतर आता ख्रिश्चनांना केलं जातयं लक्ष्य; मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांचा संघ परिवारावर आरोप

“कॅथोलिक चर्च हा देशातील सर्वात मोठा गैर-सरकारी जमीन मालक आहे”, असा दावा मासिकातील लेखातून करण्यात आला आहे.
Published by :
Rashmi Mane
Published on

वक्फ दुरुस्ती कायद्यावर घामासान चर्चा झाल्यानंतर राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने ख्रिश्चनांच्या चर्चचा विषय काढला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित मासिक ऑर्गनायझरने त्यांच्या वेबसाइटवर प्रकाशित केलेल्या एका लेखावरून हा वाद निर्माण झाला. “कॅथोलिक चर्च हा देशातील सर्वात मोठा गैर-सरकारी जमीन मालक आहे”, असा दावा या लेखातून करण्यात आला आहे.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी शनिवारी संघ परिवारावर टीका करत आरोप केला की, त्यांनी “मुस्लिमविरोधी” वक्फ दुरुस्ती विधेयक संसदेत मांडल्यानंतर आता आपले लक्ष ख्रिश्चनांवर केंद्रित केले आहे. एका वृत्तपत्राने यासंदर्भतील लेख सविस्तर प्रकाशित केला आहे. या संदर्भात उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत म्हणाले की, "भाजपचा छूपा अजेंडा बाहेर आलाय, वक्फ बोर्डानंतर आता ख्रिश्चन, बौद्ध, जैन, हिंदू अशा सगळ्या देवस्थानच्या जमिनी भाजप त्याच्या मित्रांना देणार," अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी केली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com