संतोष देशमुखांना अत्याचाराच्या आरोपात अडकवण्याचा प्लॅन ? नक्की काय आहे प्रकरण

संतोष देशमुख यांच्याबद्दलची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
Published by :
Shamal Sawant

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणाची सीआयडी तपास करण्यात आला. तसेच या प्रकरणी अनेक खुलासेदेखील केले जात आहेत. अशातच आता संतोष देशमुख यांच्याबद्दलची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

संतोष देशमुख यांना अत्याचाराच्या घटनेमध्ये अडकवण्याचा प्लॅन असल्याचे समोर आले आहे. अशी माहिती गोपनीय सूत्रांनी दिली असून याबद्दलची सविस्तर माहिती अद्याप समोर आली नाही. दरम्यान आता आता हा प्रकार नक्की काय आहे ? तसेच संतोष देशमुखांना कोणत्या अत्याचाराच्या घटनेमध्ये अडकवण्याचा प्लॅन होता? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com