ताज्या बातम्या
कॅनडामध्ये विमान कोसळलं; 2 भारतीय प्रशिक्षणार्थी वैमानिकांचा मृत्यू
कॅनडामध्ये विमान कोसळल्याची घटना घडली आहे.
कॅनडामध्ये विमान कोसळल्याची घटना घडली आहे. या विमानात दोन भारतीय प्रशिक्षणार्थी वैमानिकांसह तीन जणांचा मृत्यू झाला आहे. एका झाडावर विमान आदळल्याने विमानाचा अपघात झाला. स्थानिक प्रशासन घटनास्थळी पोहोचलं असून अधिक तपास सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कॅनडातील वँकूवरजवळील चिल्लीवॅक येथे हे विमान दुघर्टनाग्रस्त झाल्याची माहिती मिळत आहे. या विमानामध्ये दोन भारतीय शिकाऊ पायलट होते. अशी माहिती आहे.