लोकसभा प्रचारासाठी मोदींच्या 10 सभांचे नियोजन; लवकरच सभांच्या तारखा जाहीर होणार

लोकसभा प्रचारासाठी मोदींच्या 10 सभांचे नियोजन; लवकरच सभांच्या तारखा जाहीर होणार

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर आता लोकसभा प्रचारासाठी मोदींच्या 10 सभांचे नियोजन करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

राज्यात एप्रिल आणि मे महिन्यात पंतप्रधान मोदींच्या सभांचा धडाका असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत अमित शाह, योगी आदित्यनाथ यांच्याही सभा होणार असल्याची माहिती मिळत आहे. लवकरच मोदींच्या सभांच्या तारखा जाहीर करण्यात येणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com