ताज्या बातम्या
सिंहगडावर जायचे प्लॅनिंग करताय? पाहा सुरु झाली 'ही' नवीन सुविधा
पुण्यापासून सर्वात जवळचा किल्ला असलेला सिंहगड.
पुण्यापासून सर्वात जवळचा किल्ला असलेला सिंहगड. सिंहगडावर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. सुटीच्या दिवशी किल्यावर अधिकच गर्दी होते. यामुळे पर्यटकांना तिकीट काढण्यासाठी रांगेत थांबावे लागते. सिंहगडावर महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ म्हणजेच एमटीडीसीचे रिसोर्ट आहे.
आता रांगेत न राहता आता सिंहगडावर जाण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने तिकीट काढता येणार आहे. पुणे वनविभागाकडून ऑनलाइन शुल्क भरण्याची सुविधा सुरु करण्यात आली आहे. मागील आठवड्यापासून तिकीटासाठी ऑनलाईन बुकींगची सुविधा सुरु करण्यात आली आहे.