मुंबईत 'या' तारखेपासून प्लास्टिक बंदी, प्लास्टिक पिशवी दिसल्यास बसणार दंड
थोडक्यात
मुंबईकरांनो सावधान
प्लास्टिक बाळगल्यास भरावा लागेल दंड
महापालिका पुन्हा प्लास्टिक बंदीकडे
मुंबईकरांना सर्वात मोठ्या भेडसावणाऱ्या समस्येपैकी एक म्हणजे प्लास्टिकचा वापर आणि गटारांच्या तोंडावर प्लास्टिक अडकल्यानं पावसाळ्यात रस्त्यांवर पाणी तुंबण्याची समस्या उद्भवते. प्लास्टिकमुळे अनेक समस्या निर्माण होतात. त्याचं विघटन होत नाही. त्यामुळे आता पुन्हा एकदा मुंबई महापालिका प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांविरोधात आक्रमक झाली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक सुचनांचं पालन न केल्यास प्लास्टिक बाळगणाऱ्यांना मोठा दंड भरावा लागू शकतो.
मानकापेक्षा हलक्या दर्जाचे प्लास्टिक वापरल्यास थेट कारवाई
मुंबईमध्ये लघुउद्योग मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यासाठी प्लास्टिकचा वापरही मोठ्या प्रमाणात होत आहे. भाजी विक्रेते, खाद्य पदार्थ विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिक पार्सलसाठी मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा वापर करताना दिसत आहेत. मात्र, ठरवून दिलेल्या मानकापेक्षा हलक्या दर्जाचे प्लास्टिक वापरलं जात असल्याचं मुंबई महापालिकेच्या लक्षात आल्यानंतर आता प्लास्टिक वापरणाऱ्यांवर थेट कारवाई करण्यात येणार आहे.
प्लास्टिकचे उत्पादन आणि वापर केल्यास 5 हजार ते २५ हजार रुपये दंड
प्लास्टिकविषयी जनजागृती होत असतानाच मुंबईतील बाजार, दुकाने, आस्थापना आदी ठिकाणी कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कायद्यानुसार प्लास्टिकचे उत्पादन आणि वापर केल्यास 5 हजार ते २५ हजार रुपये दंड असून तीन महिन्यांच्या कारावासाच्या शिक्षेचीही तरतूद आहे.
प्लास्टिकला काय आहे पर्याय?
प्लास्टिकला पर्याय म्हणून विविध पर्यावरणपूरक सामग्रींचा वापर केला जाऊ शकतो. कागदाच्या बॅग्स, बॉक्सेस आणि कंटेनर्स प्लास्टिकच्या जागी वापरता येतात. काचाच्या बाटल्या आणि स्टीलचे कंटेनर्स देखील प्लास्टिकच्या बाटल्यांऐवजी एक चांगला पर्याय असू शकतात. स्टेनलेस स्टील, टायटॅनियम आणि अॅल्युमिनियमच्या वस्तू प्लास्टिकच्या बदल्यात वापरता येतात. बांबूपासून बनवलेल्या वस्तू हा एक पर्यावरणपूरक पर्याय आहे. बांबूपासून ब्रश, कटलरी आणि अन्य वस्तू बनवता येतात. जैविक कापूस, हेम्प आणि जूट यासारख्या पदार्थांपासून वस्त्र तयार केल्या जातात. तसेच कोकोनट शेलपासून बाऊल्स, प्लेट्स आणि अन्य वस्तू बनवता येतात. याशिवाय, बायोडिग्रेडेबल रेजिनसुद्धा प्लास्टिकचे पर्याय म्हणून वापरले जातात. यासारख्या पर्यायी सामग्रींचा वापर केल्याने पर्यावरणावरचा ऱ्हास होणार नाही. आणि प्लास्टिकचा वापर नियंत्रित केला जाऊ शकतो.