ताज्या बातम्या
PM Modi : पंतप्रधान मोदी मुंबईत दाखल! 'मेरीटाईम लीडर्स कॉन्क्लेव्ह, नेस्को सेंटरमध्ये कार्यक्रम आयोजित
गोरेगावमधील नेस्को एक्झिबिशन सेंटर येथे इंडिया मॅरिटाइम वीक 2025चे आयोजित करण्यात आले होते. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल झाले होते.
गोरेगावमधील नेस्को एक्झिबिशन सेंटर येथे इंडिया मॅरिटाइम वीक 2025चे आयोजित करण्यात आले होते. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल झाले होते. नरेंद्र मोदी गोरेगावमधील नेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये आयोजित 'इंडिया मेरीटाईम वीक (IMW) 2025' मध्ये 'मेरीटाईम लीडर्स कॉन्क्लेव्ह'ला संबोधित केल.
पंतप्रधान ब्लू इकॉनॉमीबद्दल आणि देशाच्या सागरी विकासासंदर्भात काय भाष्य करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यावेळी मोदींनी बंदर विकास, जहाजबांधणी, कोस्टल शिपिंग, हरित ऊर्जा, व सागरी उद्योग क्षेत्रात मोठ्या गुंतवणुकीची घोषणा केली.

