मोदींसाठी आज व्हाईट हाऊसमध्ये डिनरचं आयोजन; डिनरमध्ये असणार 'हा' मेन्यू
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि फर्स्ट लेडी जिल बायडेन यांनी मोदींचं स्वागत केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी व्हाइट हाउसमध्ये स्टेट डिनरचे आयोजन करण्यात आले.
शेफ नीना कुर्टिस यांनी जेवण बनवले. पंतप्रधान मोदींसाठी व्हाईट हाऊसचे कार्यकारी शेफ क्रिस कॉमर फोर्ड आणि व्हाईट हाऊसचे कार्यकारी पेस्ट्री शेफ सूसी मॉरिसन यांनी डिनरचा मेन्यू तयार केला आहे.
डिनर जिथे केला जाणार आहे ती जागा तिरंगा थीमने सजवली आहे. तसेच जेवणाचा टेबल हिरव्या रंगात सजवला आहे. त्याच टेबलावर भगव्या रंगाची फुले ठेवला जाणार आहे.
काय असणार मेन्यूमध्ये
कंप्रेस्ड वॉटरमेलन
टँगी एवाकाडो सॉस
स्टफ्ड पोर्टोबेल्लो मशरूम
क्रीमी सैफरॉन इन्फ्यूस्ड रिसोट्टो
रोज अॅन्ड कार्डामोन- इनफ्यूस्ड स्ट्रॉबेरी शॉर्टकेक
लेमन डिल योगर्ट सॉस
क्रिस्प्ड मिलेट केक
समर स्कावशेश
मॅरिनेटेड मिलेट
ग्रिल्ड कॉर्न कर्नल सलाड