Prakash Ambedkar, PM Narendra modi
Prakash Ambedkar, PM Narendra modi Team Lokshahi

पंतप्रधान मोदी ईडी, सीबीआयचा गैरवापर करत नाहीत, मी असतो तर तेच केलं असतं: प्रकाश आंबेडकर

नरेंद्र मोदी हे ईडी, सीबीआय किंवा आयकर यांचा गैरवापर करत आहेत असं मला वाटत नाही, ते जे करत आहेत ते त्यांच्या जागी मी असतो तरी तेच केलं असतं, असं आश्चर्यकारक विधान वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
Published by :
shweta walge

नरेंद्र मोदी हे ईडी, सीबीआय किंवा आयकर यांचा गैरवापर करत आहेत असं मला वाटत नाही, ते जे करत आहेत ते त्यांच्या जागी मी असतो तरी तेच केलं असतं, असं आश्चर्यकारक विधान वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. यामुळे शिवसेना ठाकरे गटाशी युती केल्यानंतर त्यांच्या या प्रकारच्या विधानांमुळे आता आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. आज झालेल्या पत्रकार परिषद ते बोलत होते.

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, "मी नरेंद्र मोदी असतो तर मी ही तेच केलं असतं. या कायदेशीर कारवाया आहेत, यात बेकायदेशीर काहीच नाही. मला आणि माझ्या पक्षाला वाचवायचं असेल तर यासाठी जे जे कायदेशीर मार्ग आहेत. त्या त्या कायद्याची आयुधे मी वापरणार. आज मला चाळीस वर्षे झाली राजकारणात आहे. तुम्ही स्वच्छ असाल तर तुम्ही समोरच्याला आव्हान देऊ शकता. पण तुम्ही तसे नसाल तर काहीच करता येणार नाही.

पुढे ते म्हणाले की, "मी जर उद्या मोदी असेन, तर मी ही मोदी जे करतात, तेच मी करेन. मी कशाला माझी खुर्ची घालवू. लोकशाहीमध्ये मला माझी खुर्ची कायदेशीर मार्गाने वाचवता येत असेल, तर ते वापरण्यात येणार. मोदींनी बेकायदेशीर असं काही केलं नाही. तुम्ही कायदेशीर मार्गाला काही करूच शकत नाही,' असे आंबेडकर म्हणाले.

Prakash Ambedkar, PM Narendra modi
Uddhav Thackeray : "बरे झाले गद्दार गेले म्हणून हिरे सापडले"; ठाकरेंचा शिंदेंवर हल्लाबोल

दरम्यान, ठाकरे गटाशी युती झाल्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी युती विपरित विधाने करण्याचा सपाटा लावला आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना 'कोण संजय राऊत?' म्हणत डिवचले होते. तर महाविकास आघाडी अस्तित्त्वात आणण्यासाठी महत्त्वाची भूमिकेत राहिलेल्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही टीका केली होती.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com