Uddhav Thackeray. Eknath Shinde
Uddhav Thackeray. Eknath Shinde Team Lokshahi

Uddhav Thackeray : "बरे झाले गद्दार गेले म्हणून हिरे सापडले"; ठाकरेंचा शिंदेंवर हल्लाबोल

राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर उद्धव ठाकरे गटातील अनेक नेते आणि पदाधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपमध्ये प्रवेश करत आहेत.

राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर उद्धव ठाकरे गटातील अनेक नेते आणि पदाधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. मात्र आता ठाकरे गट या धक्क्यातून सावरताना दिसत आहे. नाशिकमध्ये ठाकरे गटाने भाजपला मोठा धक्का दिला आहे. भाजप नेते अद्वय हिरे यांनी आज ठाकरे गटात प्रवेश केला आहे. यावेळी बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटातील आमदारांना जोरदार टोला लगावला आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले की, "बरे झाले गद्दार गेले आणि हिरे सापडले, असे ठाकरे म्हणाले. सेना भवनात पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत हिरे यांनी हातात शिवबंधन बांधले आहे.

Uddhav Thackeray. Eknath Shinde
Advay Hire : ठाकरे गटात प्रवेश करताच अद्वय हिरे यांचा भाजपवर तुफान हल्लाबोल

दरम्यान, ठाकरे गटात पक्षप्रवेशापूर्वी हिरे यांनी आपल्या समर्थकांसह रविवारी (२२ जानेवारी) उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. यावेळी झालेल्या बैठकीत कार्यकर्त्यांची भूमिका जाणून घेतली. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश करण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला. यानुसार अखेर त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com