PM Modi on Manmohan Singh : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना पंतप्रधान मोदी यांनी वाहिली श्रद्धांजली
देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांची गुरुवारी अचानक प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना तातडीने दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारावेळी त्यांचे निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या 92 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. याचपार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्रकार परिषद घेत आणि ट्वीट करत देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
त्यांनी दिलेली ही शिकवण येणाऱ्या पिढीला प्रेरणा देईल- पंतप्रधान नरेंद्र मोदी
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने आम्हाला सगळ्यांना खुप दु:ख झालं आहे. त्यांच जान हे एका राष्ट्राच्या दृष्टीने देखील आमच्यासाठी मोठी अत्यंत दुःखद घटना आहे. विभाजनाच्या काळात खुप काही गमावून भारतात येणं आणि इथे येऊन जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात गरजा मिळणे ही सामान्य गोष्ट नाही आहे. संघर्षातून वरती येण आणि यश मिळवल जाऊ शकत. त्यांच जीवन त्यांनी दिलेली ही शिकवण येणाऱ्या पिढीला प्रेरणा देत राहिलं.
अर्थशास्त्रीच्या रुपात वेगवेगळ्या सोई-सुविधा त्यांनी देशाला पुरवल्या- पंतप्रधान नरेंद्र मोदी
एका नेक माणसाच्या रुपात, तसेच एका विद्वान अर्थशास्त्रीच्या रुपात आणि रिफॉर्म असू देत त्यांना नेहमी लक्षात ठेवलं जाईल, एक अर्थशास्त्रीच्या रुपात वेगवेगळ्या सोई-सुविधा त्यांनी देशाला उपलब्ध करून दिल्या आहेत. जेव्हा जेव्हा भारत वित्तीय संकटाना सामोरा जात होता त्या प्रत्येक वेळेस डॉ. मनमोहन सिंग यांनी पुढाकार घेऊन प्रत्येक संकटाना सामोरे गेले आहेत त्यांच्या या गोष्टीला भारत आणि भारतातील जनता कधीच विसरू शकणार नाही, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच ट्वीट
पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्वीट करत म्हणाले की, 'भारताने आपले सर्वात प्रतिष्ठित नेते डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. नम्र उत्पत्तीतून उठून, तो एक सन्माननीय अर्थशास्त्रज्ञ बनला. त्यांनी विविध सरकारी पदांवर तसेच अर्थमंत्री म्हणून काम केले आणि गेल्या काही वर्षांत आमच्या आर्थिक धोरणावर मजबूत ठसा उमटवला. संसदेतील त्यांचा हस्तक्षेपही अभ्यासपूर्ण होता. आपले पंतप्रधान या नात्याने त्यांनी लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी व्यापक प्रयत्न केले.'