PM Narendra Modi Nagpur : नागपुरात पीएम मोदींचं जोरदार स्वागत, हेडगेवारांच्या स्मृती स्थळाला अभिवादन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरच्या रहाटे कॉलनी मध्ये "एक हे तो सेफ है" आशयाचे बॅनर लावण्यात आले आहेत. नागपूरात झालेल्या हिंसाचारानंतर पंतप्रधानांचा हा दौरा असल्याने बॅनरच्या माध्यमातून हिंसा भडकविणाऱ्यांना हा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
नागपुरात दाखल झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम रेशीम बाग येथे दाखल झाले असून या दौऱ्यात त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉक्टर केशव बलिराम हेडगेवार यांच्या स्मारकाला भेट दिली आहे. हेडगेवार स्मृती मंदिरात पंतप्रधान मोदींनी डॉक्टर हेडगेवार आणि गोलवलकर गुरुजी यांच्या समाधीचे दर्शन घेतल आणि तिथे पुष्पांजली अर्पित केले. यादरम्यान, त्यांचे स्वागत आरएसएसचे पूर्व सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी केले.
त्यानंतर मोदी दीक्षाभूमी येथे दाखल झाले असून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन केले आहे. त्यांची ही दुसरी भेट आहे, यापूर्वी 14 एप्रिल 2017 रोजी त्यांनी प्रथमच येथे अभिवादन केले होते. आता ते आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस आदरांजली वाहतील. त्यानंतर दीक्षाभूमी स्मारक समितीच्या वतीने स्वागत स्वीकारणार आहेत. त्यानंतर माधव नेत्रालयाच्या कार्यक्रमाला हजेरी लावतील. हिंदू नववर्षाच्या सुरूवातीलाच पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूरमध्ये दाखल झाले असून पंतप्रधान राज्यातील जनतेला काय संदेश देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.