PM Modi Vs Donald Trump : 35 मिनिटांच्या संभाषणात ट्रम्प यांची हवाच काढली! भारत-पाकिस्तान मध्यस्थीच्या दाव्यावरुन मोदींनी खडेबोल सुनावले

PM Modi Vs Donald Trump : 35 मिनिटांच्या संभाषणात ट्रम्प यांची हवाच काढली! भारत-पाकिस्तान मध्यस्थीच्या दाव्यावरुन मोदींनी खडेबोल सुनावले

पंतप्रधान मोदींनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा केली. यात पाकिस्तानसोबतच्या तणावात कोणत्याही प्रकारची मध्यस्थी भारताने स्विकारली नाही असं ते म्हणाले आहेत.
Published by :
Prachi Nate
Published on

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या परदेश दौऱ्यावर असून त्यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी अलीकडेच फोनवर 35 मिनिटे चर्चा केली. या संवादादरम्यान, भारताने पाकिस्तानसोबतच्या तणावात कोणत्याही तृतीय पक्षाच्या मध्यस्थीची गरज नाही, हे स्पष्ट शब्दांत सांगितले. त्यामुळे ट्रम्प यांनी केलेल्या मध्यस्थीच्या दाव्याचे त्यांनी खंडन केले.

पूर्वी ट्रम्प यांनी दावा केला होता की, त्यांच्या प्रयत्नांमुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम शक्य झाला. मात्र, मोदींनी स्पष्ट केलं की, भारताने अशा कोणत्याही मध्यस्थीचा स्वीकार केलेला नाही आणि भविष्यातही करणार नाही. भारताच्या सडेतोड कारवाईनंतर पाकिस्तानलाच मागे हटण्याची गरज वाटली, असेही त्यांनी सांगितले.

ही चर्चा G7 परिषदेसाठी कॅनडात दोघांमध्ये प्रत्यक्ष भेट होण्याची शक्यता असताना, ट्रम्प यांनी इस्रायल-इराण तणावामुळे दौरा अर्धवट सोडल्यामुळे व्हर्च्युअल माध्यमातून झाली. फोनद्वारे झालेल्या संवादात पंतप्रधान मोदींनी 'ऑपरेशन सिंदूर'ची सविस्तर माहिती दिली. 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी केंद्रांवर लक्ष्यभेदी कारवाई केली, हे त्यांनी ट्रम्प यांना स्पष्ट केलं.

भारताने आपल्या संरक्षण धोरणात कोणतीही माघार घेतलेली नसून, गरज भासल्यास गोळीला गोळ्यानेच उत्तर दिले जाईल, असा संदेशही मोदींनी दिला. याच अनुषंगाने ट्रम्प यांनी घेतलेले शांततेचे श्रेय निराधार असल्याचं देखील मोदींनी स्पष्ट केलं. या चर्चेने पुन्हा एकदा भारताची स्वावलंबी आणि ठाम भूमिका जगासमोर अधोरेखित झाली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com