PM Narendra Modi : ही दिवाळी शेतकऱ्यांसाठी लाभदायक! मोदी सरकारकडून दोन नवीन योजनांची घोषणा, जाणून घ्या लाभ कसा घेता येईल?

PM Narendra Modi : ही दिवाळी शेतकऱ्यांसाठी लाभदायक! मोदी सरकारकडून दोन नवीन योजनांची घोषणा, जाणून घ्या लाभ कसा घेता येईल?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजवादी नेते जयप्रकाश नारायण यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी कृषी क्षेत्रासाठी दोन मोठ्या योजना सुरू केल्या.
Published by :
Prachi Nate
Published on

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजवादी नेते जयप्रकाश नारायण यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी कृषी क्षेत्रासाठी दोन मोठ्या योजना सुरू केल्या. या योजनांचा एकूण खर्च ₹35,440 कोटी असून, त्यांचा उद्देश भारताला दाळ उत्पादनात आत्मनिर्भर बनवणे आणि कमी कामगिरी करणाऱ्या कृषी जिल्ह्यांचे पुनरुत्थान करणे हा आहे.

याशिवाय, कृषी, पशुपालन, मत्स्यपालन आणि अन्न प्रक्रिया क्षेत्रातील विविध प्रकल्पांचे उद्घाटनही केले. मिळालेल्या माहितीनुसार, 'डाळ स्वावलंबन अभियान' साठी 11,440 कोटी रुपये खर्च येईल आणि 2030-31 पर्यंत डाळींचे उत्पादन सध्याच्या 25.238 दशलक्ष टनांवरून 35 दशलक्ष टनांपर्यंत वाढवून देशाचे आयात अवलंबित्व कमी करणे हे उद्दिष्ट आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com