पंतप्रधान मोदी बेंगळुरूमध्ये दाखल; इस्रोच्या चांद्रयान टीमचे कौतुक करताना मोदी भावूक
चांद्रयान-3 मोहिमेच्या यशाचं जगभर कौतुक केलं जात आहे. 23 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांना फोन करून त्यांचे अभिनंदन केले पंतप्रधान मोदी आज (26 ऑगस्ट रोजी) बेंगळुरुमध्ये दाखल झाले. मोहिमेत सहभागी असलेल्या इस्रोच्या टीमच्या सर्व शास्त्रज्ञांची त्यांनी भेट घेतली.
यावेळी पंतप्रधान मोदींनी सर्वांशी संवाद साधला. मोदी म्हणाले की, देशातली शास्त्रज्ञांनी अशक्य ते शक्य केलं. तुमचं कितीही कौतुक केलं तरी ते कमी आहे. इस्त्रोमुळे आज भारताचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे. आजच्या भारतानं इतिहास घडवला. लॅँडर जिथे उतरलं त्याला आता शिवशक्ती असं नाव. 23 ऑगस्ट हा दिवस सर्वांच्या लक्षात राहणारा. मोदी म्हणाले.
तसेच तो प्रेरणादायी क्षण होता. हे सर्वसाधारण यश नाही आहे. शास्क्षज्ञांच्या जिद्दीला सलाम. चांद्रयान 3 मध्ये महिलांची मोठी भूमिका. शिवशक्ती भविष्यातील पिढीसाठी प्रेरणादायी. हा भारतातील विज्ञान सामर्थ्याचा शंखनाद आहे. चांद्रयान 2 उतरलेल्या जागेला तिरंगा नाव.