जगातील सर्वात मोठं रिव्हर क्रूझ भारतात सुरू होणार ; पंतप्रधान दाखवणार हिरवा झेंडा

जगातील सर्वात मोठं रिव्हर क्रूझ भारतात सुरू होणार ; पंतप्रधान दाखवणार हिरवा झेंडा

जगातील सर्वात मोठं रिव्हर क्रूझ भारतात सुरू होणार आहे. या क्रूझला पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवणार आहेत.

जगातील सर्वात मोठं रिव्हर क्रूझ भारतात सुरू होणार आहे. या क्रूझला पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवणार आहेत. भारतात लवकरच नदीतील सर्वात मोठं क्रूझचा प्रवास सुरू होणार आहे. महत्वाची बाब म्हणजे, हे क्रूझ नदीत चालणारं जगातील सर्वात मोठं क्रूझ असणार आहे. यात शॉवरसह बाथरूम्स आहे. कन्वर्टेबल बेड्स, फ्रेंच बाल्कनी, एलईडी टीव्ही, तिजोरी, स्मोक अलार्म्स, लाईफ वेस्ट आणि स्प्रिंकलर्स यांचा समावेश आहे.

या क्रूझचा प्रवास 13 जानेवारी 2023 रोजी वाराणसीपासून सुरू होईल आणि 1 मार्च रोजी हे क्रूझ दिब्रुगडला पोहोचण्याची शक्यता आहे. वाराणसीतील गंगा नदीवर प्रसिद्ध गंगा आरती करून ही क्रूझ आपल्या प्रवासाला सुरुवात करेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी 13 जानेवारी, 2023 वाराणसीमध्ये या क्रूझला हिरवा झेंडा दाखवणार आहेत.

'एमव्ही गंगा विलास' हे नदीवरील क्रूझ शुक्रवारी वाराणसीहून आपल्या पहिल्या प्रवासाला मार्गस्थ होणार आहे.या क्रूझमध्ये 18 आलिशान खोल्या आहेत. क्रूझवर एक आलिशान रेस्टॉरंट्स, स्पा आणि सनडेक देखील आहे. क्रूझच्या मुख्य डेकवर 40 जणांसाठी आसनव्यवस्था असलेलं रेस्टॉरंट आहे. या रेस्टरंट्समध्ये कॉन्टिनेंटल आणि भारतीय पाककृतींसह काही बुफे काउंटर आहेत. वरच्या डेकच्या आऊटडोअर सीटिंगमध्ये रिअल टीक स्टीमर खुर्च्या आणि कॉफी टेबलही आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com