Pm Narendra Modi
Pm Narendra Modi

२०२४ नव्हे, २०४७ मोदींचं लक्ष्य? मुलाखतीत खुद्द PM नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले, "दोन्ही गोष्टी..."

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एएनआयला मुलाखत दिली. यावेळी मोदींनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं.
Published by :

Pm Narendra Modi Interview : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एएनआयला मुलाखत दिली. यावेळी मोदींनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. तुम्ही अनेक भाषणात म्हटलंय की, २०२४ तुमचं लक्ष्य नाही, २०४७ आहे? तोपर्यंत काय होणार आहे? या प्रश्नाचं उत्तर देताना मोदी म्हणाले, २०४७ आणि २०२४ या दोन्ही गोष्टींना मिक्सअप केलं नाही पाहिजे. दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. जेव्हा देश स्वातंत्र्याचे ७५ वर्ष अमृत महोत्सव साजरा करत होता, तेव्हाच मी हा विषय सर्वांसमोर मांडला होता.

२०४७ ला देशाच्या स्वातंत्र्याला शंभर वर्ष पूर्ण होतील. अशा माईलस्टोनमधून नवीन उत्साह निर्माण होतो. नवीन संकल्पांसाठी नव्या माणसाला तयार करतात. ७५ वर्षात आपण उभे आहोत. १०० वर्षात पोहोचणार आहोत. या २५ वर्षांचा सर्वाधिक उपयोग कसं कराल? आपल्याकडे एक लक्ष्य असलं पाहिजे. मी माझ्या गावाचा प्रधान आहे. २०४७ पर्यंत मी माझ्या गावासाठी एव्हढं तर करेन, असंही मोदी म्हणाले.

मोदी पुढे म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्याला शंभर वर्ष पूर्ण झाल्यावर देशात एक प्रेरणा निर्माण होईल. २०२४ हा पाच वर्षांच्या निवडणुकीच्या क्रमवारीनुसार आलेलं वर्ष आहे. लोकशाहीत निवडणुकीला अधिक महत्व दिलं पाहिजे. हे खूप मोठं महापर्व आहे. याला उत्सवाच्या रुपात साजरा केला पाहिजे. स्पोर्ट्स इव्हेंट जेव्हा होतात, तेव्हा स्पोर्ट्समन स्पिरीटचा सूर उमटू लागतो. निवडणुकीचं वातावरण आपण लोकांच्या उत्सवात साजरं केलं, तर येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी लोकशाही संस्कार बनतं. लोकशाही संविधानाच्या सीमारेषेत बनलं नाही पाहिजे. आपल्या रक्तात असलं पाहिजे.

आपल्या संस्कारात असलं पाहिजे. याच अनुषंगाने २०२४ ला पाहतो. २०२४ ची निवडणुकीच्या माध्यमातून देशासमोर भाजप आणि काँग्रसेचं मॉडेल आहे. काँग्रेसचं पाच-सहा दशकांचं काम. त्यांच्यासाठी मी खुलं मैदान सोडतो. पण माझं फक्त दहा वर्षांचं काम. तुम्ही कोणत्याही क्षेत्राशी या कामाचं मुल्यमापन करा. जर काही कमी असतील, तर आमच्या प्रयत्नात कमी राहिली नसेल.

दहा वर्षाच्या कारकिर्दीत दोन वर्ष कोरोना महामारीत गेले. तरीही देशाचा सर्वसमावेशक विकास केला आहे. मला पुढच्या टर्ममध्ये विकासाचा वेग आणखी वाढवायचा आहे. मी देशाला मजबूत करण्याच्या उद्देशाने काम करत आहे. जेव्हा तुम्ही मेहनतीने आणि प्रामाणिकपणे काम करता, त्यावेळी तुम्हाला चांगाल रिझल्ट मिळतो, असंही मोदी म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com