पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शरद पवार, उद्धव ठाकरे यांना ऑफर; रोहित पवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शरद पवार, उद्धव ठाकरे यांना ऑफर; रोहित पवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

आज नंदूरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होती.
Published by :
Siddhi Naringrekar

आज नंदूरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होती. या सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना ऑफर दिली आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे, अजित पवारांसोबत एनडीएमध्ये यावं, त्यांची सगळी स्वप्न पूर्ण होतील. असे म्हणाले. यावर आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता रोहित पवार यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार म्हणाले की, राज्यात फोडाफोडीचे राजकारण करूनही महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता भाजपसोबत जात नसल्याचं दिसताच पंतप्रधान मोदी साहेबांनी आदरणीय पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब यांना सोबत येण्याची ऑफर दिली. ही ऑफर म्हणजे भाजप केंद्रात पुन्हा सत्तेत येत नसल्याची कबुलीच आहे. असे रोहित पवार म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com