PM Narendra Modi : अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी पंतप्रधान मोदी म्हणाले...

PM Narendra Modi : अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी पंतप्रधान मोदी म्हणाले...

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु होत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बजेटमध्ये अनेक मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील संसदेचे हे शेवटचे अधिवेशन असणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामण उद्या बजेट मांडणार आहेत. नव्या वर्षांतील संसदेचे पहिले अधिवेशन असल्याने त्याची सुरूवात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने होणार आहे. आगामी अधिवेशनात अनेक मुद्दे उपस्थित केलं जाण्याची शक्यता आहे.

याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधन केलं. पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे, तेव्हा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे मार्गदर्शन आणि उद्या निर्मला सीतारामण यांचे अंतरिम अर्थसंकल्प हे एक प्रकारे, नारीशक्तीच्या पर्वाला सुरुवात झाली. कर्तव्यपथावर नारी शक्तीचं सामर्थ्य, स्थैर्य, संकल्पशक्ती देशानं पाहिली. संसदेत घातलेल्या गोंधळावर पश्चातापाची विरोधकांना संधी आहे. गोंधळ घालणं लोकांचा स्वभाव.

निवडणुका जवळ असताना पूर्ण बजेट मांडल जात नाही. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर आम्ही तुमच्यासमोर पूर्ण बजेट मांडू. तुम्हाला सर्वांना 2024 साठी राम-राम. आम्ही संसदेत महिला आरक्षण विधेयक मंजूर केलं.मागच्या 10 वर्षात ज्याला जे सूचलं, त्याने त्या पद्धतीने संसदेत काम केलं. असे मोदी म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com