PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ऐतिहासिक परदेश दौरा; G7 परिषदेसह सायप्रस, क्रोएशियाला देणार भेट

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ऐतिहासिक परदेश दौरा; G7 परिषदेसह सायप्रस, क्रोएशियाला देणार भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, 15 जूनपासून पाच दिवसांच्या परदेश दौऱ्यावर रवाना झाले आहेत. या दौऱ्यात ते सायप्रस, कॅनडा आणि क्रोएशिया या तीन देशांना भेट देतील.
Published by :
Team Lokshahi
Published on

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, 15 जूनपासून पाच दिवसांच्या परदेश दौऱ्यावर रवाना झाले आहेत. या दौऱ्यात ते सायप्रस, कॅनडा आणि क्रोएशिया या तीन देशांना भेट देतील. पंतप्रधानांचा हा दौरा ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतरचा पहिला परदेश दौरा आहे. पंतप्रधान मोदी सर्वप्रथम सायप्रसला भेट देत आहेत. 15-16 जून या कालावधीत ते सायप्रसचे राष्ट्रपती निकोस क्रिस्टोडौलिडेस यांच्या निमंत्रणावर तिथे असतील. दोन दशकांनंतर भारतीय पंतप्रधान सायप्रसला भेट देणार आहे.

यानंतर, 16-17 जून दरम्यान, पंतप्रधान मोदी कॅनडामधील कनानास्किस येथे G7 शिखर परिषदेत सहभागी होतील. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी त्यांना निमंत्रण दिलं आहे. मोदी सहाव्यांदा G7 परिषदेत सहभागी होणार आहेत. परिषदेमध्ये ऊर्जा सुरक्षा, AI-ऊर्जा नाते, तंत्रज्ञान आणि क्वांटमसंबंधी मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. मोदी अनेक द्विपक्षीय बैठकाही घेणार आहेत.

दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात, 18 जून रोजी मोदी क्रोएशियाला पोहोचतील. अद्याप कोणत्याही भारतीय पंतप्रधानांनी क्रोएशियाचा दौरा केला नव्हता. त्यामुळे मोदी हे क्रोएशियाला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान ठरणार आहेत. तेथे ते पंतप्रधान अँड्रेज प्लेंकोविच यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील आणि 19 जून रोजी भारतात परततील.

हेही वाचा

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ऐतिहासिक परदेश दौरा; G7 परिषदेसह सायप्रस, क्रोएशियाला देणार भेट
Kedarnath Helicopter Crash : केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं, 5 जणांचा मृत्यू
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com