ताज्या बातम्या
Nashik : नाशिकमध्ये तलवारीचा धाक दाखवणाऱ्या तरुणाची पोलिसांनी काढली धिंड
नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका पेट्रोल पंपावर फाटकी नोट चालकाने घेतली नाही म्हणून तलवारीचा धाक दाखवण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
थोडक्यात
पेट्रोल पंपावर दहशत माजवण्याचा प्रयत्न
तलवारीचा धाक दाखवून दहशत निर्माण करण्याचा व्हिडिओ समोर
दहशत माजवणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पोलिसांनी हातात तलवार घेऊन इसमाची काढली धिंड
नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका पेट्रोल पंपावर फाटकी नोट चालकाने घेतली नाही म्हणून तलवारीचा धाक दाखवण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या घटनेनंतर परिसरात एक खळबळ उडाली. दहशत माजवणाऱ्या इसमाला पोलिसांनी बेड्या घातल्या आहेत.
नागरिकांमधील दहशत कमी व्हावी यासाठी पोलिसांनी हातात तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्या या इसमाची या परिसरातून धिंडही काढली, नाशिक पोलिसांच्या या कारवाईचा नाशिककरांनी स्वागत केल आहे.
