पार्किंग मधील दुचाक्या चोरणारा सराईत चोरटा गजाआड
अमदज खान, कल्याण : पार्किंगमध्ये पार्क केलेल्या गाड्या हेरून गाड्या चोरणाऱ्या सराईत चोरट्याला कल्याण रेल्वे लोहमार्ग पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. नंदुलाल भोईर असे आरोपीचे नाव असून नंदूलाल हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्या विरोधात या आधी देखील कल्याण महात्मा फुले पोलीस ठाणे ,कसारा पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. नंदुलाल हा महिनाभरा पूर्वी बाईक चोरीच्या गुन्ह्यातून जेलमधून सुटून आला होता.
रेल्वे स्टेशन लगत असलेल्या पार्किंग मधून दुचाकी चोरीला गेल्याच्या घटना घडल्या होत्या. टिटवाळा रेल्वे स्टेशन परिसरतील पार्किंग मधून दुचाकी चोरीला गेल्याबाबत कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. कल्याण रेल्वे पोलिसांनी तत्काळ या चोरट्यांचा शोध सुरू केला परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तसेच खबऱ्या मार्फत या चोरट्याची माहिती मिळवली, पोलिसांनी तात्काळ नंदूलालचा माग काढत त्याला बेड्या ठोकल्या आहेत. नंदुलाल हा मूळचा राहणारे शहापूर येथे राहणारा आहे.
रेल्वे स्थानकालगत असलेल्या पार्किंग मधील दुचाकी हेरायचा व या दुचाकी चोरी करायचा. पार्किंग मधून दुचाकी चोरी केल्या प्रकरणी त्याला आधी देखील कल्याण महात्मा फुले पोलीसांनी अटक केली होती. महिनाभरापूर्वी तो जेलमधून जामिनावर सुटला होता. त्यानंतर त्याने महिनाभरात पुन्हा आपला हा चोरीचा धंदा सुरू केला व पोलीसांच्या जाळ्यात अडकला.