ताज्या बातम्या
Ram Gopal Varma : राम गोपाल वर्मा यांच्या विरोधात पोलीस तक्रार दाखल
राम गोपाल वर्मा यांच्या विरोधात पोलीस तक्रार दाखल करण्यात आली आहे.
राम गोपाल वर्मा यांच्या विरोधात पोलीस तक्रार दाखल करण्यात आली आहे. चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा पुन्हा एकदा वादात सापडले असून धार्मिक भावना दुखावल्याबद्दल आंध्र प्रदेशात त्यांच्याविरुद्ध पोलीस तक्रार दाखल करण्यात आली आहे.
राम गोपाल वर्मा यांनी सोशल मीडियावर हिंदूविरोधी टिप्पण्या केल्या, ज्यामुळे हिंदू समुदायाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.
राष्ट्रीय प्रजा काँग्रेसचे अध्यक्ष मेदा श्रीनिवास यांनी वर्मा यांच्या सोशल मीडिया पोस्ट आक्षेपार्ह असल्याचे म्हटले असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.