Phaltan Doctor Death Case  : डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात पोलिसांच्या हाती मोठा पुरावा, डायरी ताब्यात

Phaltan Doctor Death Case : डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात पोलिसांच्या हाती मोठा पुरावा, डायरी ताब्यात

फलटण महिला डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात पोलिसांना मोठा पुरावा मिळाला आहे. पोलिसांनी डॉ. संपदा मुंडे यांची डायरी ताब्यात घेतली असून त्यातून महत्वाचे खुलासे होण्याची शक्यता आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

थोडक्यात

  • डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात महत्वाचे खुलासे होण्याची शक्यता

  • पोलिसांनी डॉ. संपदा मुंडे यांची डायरी ताब्यात घेतली

  • आरोपी आणि संपदा मुंडे यांच्या मोबाईलची तपासणी सुरू

फलटण महिला डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात पोलिसांना मोठा पुरावा मिळाला आहे. पोलिसांनी डॉ. संपदा मुंडे यांची डायरी ताब्यात घेतली असून त्यातून महत्वाचे खुलासे होण्याची शक्यता आहे.

मूळ बीड जिल्ह्यातील असलेल्या डॉ. संपदा मुंडे या फलटण उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांनी फलटणमधील एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली. त्यांनी हातावर लिहिलेल्या नोटमध्ये पीएसआय गोपाळ बदने याच्यावर चार वेळा बलात्काराचा आरोप केला आहे. तसेच प्रशांत बनकर या व्यक्तीचं नावही त्यांनी नमूद केलं आहे.

पोलिसांनी दोन्ही आरोपी आणि संपदा मुंडे यांच्या मोबाईलची तपासणी सुरू केली आहे. साताऱ्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी सांगितले की, “पीडित आणि आरोपी सतत संपर्कात होते, त्यामुळे त्यांच्या नात्याबाबत तपास सुरू आहे.”

मोबाईलशिवाय संपदा मुंडे यांची डायरी पोलिसांच्या ताब्यात आली आहे. या डायरीत त्यांनी स्वतःच्या आयुष्याशी संबंधित अनेक गोष्टी लिहिल्या असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या प्रकरणात काय घडले हे स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, संपदा मुंडे यांच्या कुटुंबीयांनी या प्रकरणाची एसआयटीमार्फत तपासणी करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाला राजकीय वळण लागल्याचंही बोललं जात आहे. पोलिसांचा तपास सुरू असून लवकरच सत्य समोर येईल, अशी अपेक्षा आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com