डॉक्टरांना मारहाण प्रकरणात समता नगर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी निलंबित
रिध्देश हातिम| मुंबई: कांदिवलीतील समता नगर पोलीस ठाण्यात दोन डॉक्टरांना तीन तास थांबून त्यांना चक्कीच्या पट्ट्यांनी मारहाण करून तसेच 25 हजार रुपयांची लाच स्वीकारल्याचा आरोपात पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वाहतूक नियमभंग केल्याप्रकरणी 25 मार्चला डॉ. सार्थक राठी आणि त्यांचा मित्र डॉ. शिरीष राव यांना ठाणे अंमलदार कक्षात आणले होते. त्यांना दुपारी साडेतीन ते साडेसहा वाजेपर्यंत पोलीस ठाण्यात उभे ठेवण्यात आले होते. यावेळी प्राथमिक चौकशीवेळी राठी व राव यांच्यावर हातावर पट्ट्याने मारहाण करण्यात आली.
दरम्यान, राव यांना प्रथम चौकशी कक्षात नेण्यात आल्याचे सीसीटीव्ही चित्रीकरण दिसून येत आहे. डॉक्टरांकडून आरोप करण्यात येत आहे की उपनिरीक्षक प्रफुल मासळ, पोलीस नाईक सचिन पाटील यांनी 25 हजार रुपयांची लाच स्वीकारली आहे. दरम्यान याबाबतची पोलीस निरीक्षक प्रकाश पवार यांनी दखल घेतली नाही, तसेच कनिष्ठ अधिकाऱ्यांनी कारवाई केली की नाही याबाबत पाठपुरावा केला नाही, असा आरोप आहे. त्यामुळे या अपर पोलीस आयुक्तांनी पोलीस निरीक्षक प्रकाश पवार पोलीस उपनिरीक्षक प्रफुल मासळ आणि पोलीस नाईक सचिन पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे