ताज्या बातम्या
होळी, धूलिवंदनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
होळी आणि धुलिवंदनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मुंबई पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त करण्यात येणार आहे.
होळी आणि धुलिवंदनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मुंबई पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त करण्यात येणार आहे. वाहतूकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे.
मुंबई आणि उपनगरात ०७ अपर पोलीस आयुक्त, १९ पोलीस उप आयुक्त,५१ सहायक पोलीस आयुक्तांची नियुक्ती करण्यात आल्या आहेत.
यासोबतच १७६७ पोलीस अधिकारी आणि ९१४५ पोलीस अंमलदार बंदोबस्तकरीता तैनात करण्यात आले आहेत. मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यात रस्त्यावर चौकात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.