सांगोल्यात पोलीस उपनिरीक्षकाची हत्या

सांगोल्यात पोलीस उपनिरीक्षकाची हत्या

सांगोल्यामध्ये पोलीस उपनिरीक्षकाची हत्या झाल्याचा धक्कादायक घटना घडली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

अभिराज उबाळे, पंढरपूर

सांगोल्यामध्ये पोलीस उपनिरीक्षकाची हत्या झाल्याचा धक्कादायक घटना घडली आहे. सुरज चंदनशिवे असे या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. बुधवारी रात्री अकरा वाजता जेवणानंतर सुरज चंदनशिवे हे शतपावली करण्यासाठी वासूद - केदारवादी रस्त्यावर गेले होते. यावेळी दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी चंदनशिवे यांच्यावर पाठीमागून धारदार शस्त्राने वार केले.रात्रभर चंदनशिवे घरी न आल्याने नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली. सकाळी सहा वाजता त्यांचा मृतदेह वासुद केदारवाडी रस्त्यावर आढळून आला. सुरज चंदनशिवे हे सांगली जिल्ह्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्यात कार्यरत असल्याची माहिती मिळत आहे.

मिरजेत गाजलेल्या नऊ कोटी रुपयांच्या अपोहरामधील सुरज चंदनशिवे हे आरोपी होते. मिरज मध्ये चोराला हाताशी धरून नऊ कोटी 18 लाख रुपयांचा अपहार करण्यात आला होता. याप्रकरणी तात्कालीन पोलीस निरीक्षकासह सात पोलिसांवर कारवाई करून त्यांचे निलंबित करण्यात आले होते. सुरज चंदनशिवे हे या गुन्ह्यातील आरोपी होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांना जेलवारी देखील करावी लागली होती. जामिनावर बाहेर आल्यानंतर त्यांचे निलंबन रद्द करून त्यांची सांगली पोलीस मुख्यालयामध्ये नेमणूक करण्यात आली होती. त्यानंतर विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये बदली करण्यात आल्याचे समजते.

चंदनशिवे यांचे मूळ गाव सांगोला तालुक्यातील वासुद आहे. तर त्यांची सासुरवाडी सांगोला तालुक्यातील जवळा असल्याचे समजते. या घटनेनंतर सांगोला तालुक्यामध्ये खळबळ उडाली आहे. सांगोल्याचे पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी सर्व बाजूंनी तपास सुरू केला आहे. हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com