Sunil Tatkare vs Prafulla Patel
Sunil Tatkare vs Prafulla Patel

केंद्रीय मंत्रिपदावरून राष्ट्रवादीत वाद! सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यात रस्सीखेच, फडणवीसांच्या भेटीमुळं घडामोडींना वेग

केंद्रीय मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एकही मंत्रिपद देणार नसल्याचं सांगितलं जात आहे. पण दुसरीकडे केंद्रीय मंत्रिपदावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात वाद सुरु आहे.
Published by :

Narendra Modi Oath Ceremony 2024 Latest Update : लोकसभा निवडणूक २०२४ चा निकाल जाहीर झाल्यानंतर आता सर्वांनाच वेध लागले आहेत, ते पंतप्रधानपदाच्या आज होणाऱ्या शपथविधी सोहळ्याचे. या निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने नरेंद्र मोदींना भाजप्रणीत सरकार स्थापन करता येणार नाहीय. कारण भाजपच्या एनडीए आघाडीत असणाऱ्या मित्रपक्षांनी नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आज सायंकाळी साडेसात वाजता नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. परंतु, केंद्रीय मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एकही मंत्रिपद देणार नसल्याचं सांगितलं जात आहे. पण दुसरीकडे केंद्रीय मंत्रिपदावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात वाद सुरु आहे. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यात रस्सीखेच सुरु असल्याची माहिती समोर येत आहे.

एनडीए आज सरकार स्थापन करणार आहे. त्यामुळे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी अनेक खासदारांना मंत्रिपदासाठी फोन केल्याचंही समोर आलं आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काहीच आलबेल नसल्याचं चित्र आहे. सुनील तटकरे रायगड मतदारसंघातून निवडून आले आहेत. तर प्रफुल्ल पटेल राज्यसभेचे खासदार आहेत. या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ४ जागांवर निवडणूक लढवली होती. परंतु, राष्ट्रवादीचा एकाच जागेवर विजय झाला. सुनील तटकरे यांनी महायुतीचे उमेदवरा अनंत गीते यांचा पराभव केला. तसच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा बारामती लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. सुप्रिया सुळे यांनी १ लाख ६७ हजारांहून अधिक मताधिक्क्यानं सुनेत्रा पवारांचा पराभव केला. महाराष्ट्रात राष्ट्रवादीला ४ पैकी १ जागा जिंकता आल्यानं अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.

दिल्लीत सुनील तटकरेंच्या निवासस्थानी खलबलं

उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुनील तटकरे, राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आदी नेते या बैठकीला उपस्थित होते. पहिल्या टर्ममध्ये राष्ट्रवादीला मंत्रिपद मिळणार नाही, म्हणून देवेंद्र फडणवीस या नेत्यांची मनधरणी करायला दिल्लीत तटकरेंच्या निवासस्थानी गेले असल्याचं बोललं जात आहे. राष्ट्रवादीच्या खासदारांना मंत्रिपदासाठी कोणताही फोन आलेला नसल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com