ठाकरे - शिंदेंच्या ब्रेकअपवर आज सुनावणी; व्हॅलेंटाईन डे'चे गिफ्ट कुणाला मिळणार?
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचं प्रकरण हे सात न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे द्यावं अशी मागणी ठाकरे गटाच्या वतीनं करण्यात आली आहे. त्यावर आज सुनावणी होणार आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचं प्रकरण हे सात न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे द्यावं अशी मागणी ठाकरे गटाच्या वतीनं करण्यात आली आहे. त्यावर आज सुनावणी होणार आहे.
सत्तासंघर्षाचं हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आलं 20 जून 2022 च्या दरम्यान. त्यानंतर आता आठ महिने झाले तरी या केसमध्ये अद्याप एकही निर्णय, आदेश झालेला नाही, केवळ बेंच बदलत आलेत. त्यामुळे आता आज काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
फेरविचार करण्यासाठी सात सदस्यीय घटनापीठाची स्थापना करावी, अशी विनंती शिवसेना ठाकरे गटातर्फे बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी गेल्या सुनावणीच्या वेळी न्यायालयास केली होती. यासंदर्भातील याचिका सात सदस्यीय पीठापुढे सुनावणीसाठी गेल्यास निर्णयासाठी बराच कालावधी लागेल. त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून पाच सदस्यीय पीठापुढेच सुनावणी व्हावी, अशी विनंती केली जाण्याची शक्यता आहे.
आता 7 न्यायमूर्तींच्या पीठाकडे देण्याची मागणी सुप्रीम कोर्ट मान्य करणार का? की या प्रकरणात आणखी काही नवं वळण मिळणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.