Ajit Pawar : 'हे पाप कुठे फेडणार?....'; अजित पवारांचा नेमका कुणावर निशाणा
Ajit Pawar : महापालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर राज्यातील राजकारणात एकच गदारोळ उडालेला आहे. महायुतीतल्या नेत्यांमध्ये जागावाटपावरून नाराजी दिसून येत आहे. यावेळी राज्यातील महापालिकांवर कोणाचं वर्चस्व असणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरलं आहे. यासाठी सर्वच पक्षातील नेत्यांनी तयारी सुरु केली आहे आणि ठिकठिकाणी त्यांचे सभा सुरु आहेत. अशाच एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेवर जोरदार टीका केली.
अजित पवार म्हणाले, "पिंपरी चिंचवड महापालिका कधी आशियामधील सर्वात श्रीमंत महापालिका होती. मात्र आज ती कर्जाच्या डोंगराखाली बुडालेली आहे. हे पाप कुठे फेडणार?" असं म्हणून त्यांनी भाजपचे भोसरी विधानसभा क्षेत्राचे आमदार महेश लांडगे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली.
त्यांनी पुढे सांगितलं, "पिंपरी चिंचवडमध्ये आता राजकारणात फोडाफोडी सुरु झाली आहे. लोकांना दबाव टाकला जात आहे. महापालिकेच्या निविदा फक्त ठेकेदारांच्या फायद्यांसाठी काढल्या जात आहेत. तसेच टँकर माफियांच्या प्रभावाखाली पाणी पुरवठा करण्यात येत असल्याचा आरोप अजित पवार यांनी केला."
अजित पवार यांनी संत पिठाच्या बाबतीतही टीका केली. ते म्हणाले, "स्व. दत्ता काका साने यांच्या कल्पनेनुसार सुरु झालेल्या संत पिठाच्या ठिकाणी आता खासगी कंपनी सुरू केली गेली आहे. संत साहित्याऐवजी CBSE स्कूल सुरु करायला काय होणार? कसे साधता येईल तिथे वारकरी साहित्याचं ज्ञान?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला. अशाप्रकारे, अजित पवार यांनी महेश लांडगे यांच्या कारभारावर तीव्र टीका केली असून, महापालिकेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
थोडक्यात
महापालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर राज्यातील राजकारण तापले आहे.
महायुतीतील नेत्यांमध्ये जागावाटपावरून नाराजी दिसून येत आहे.
यावेळी राज्यातील महापालिकांवर कोणाचा वरचष्मा राहणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
सर्वच पक्षांनी निवडणुकीसाठी तयारीला सुरुवात केली आहे.
विविध ठिकाणी नेत्यांच्या सभा आणि कार्यक्रम सुरू झाले आहेत.
अशाच एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेवर जोरदार टीका केली.

