pooja khedkar : दिल्लीत पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी

pooja khedkar : दिल्लीत पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी

दिल्लीत पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी होणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

दिल्लीत पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी होणार आहे. याआधी पूजा खेडकरला कोर्टाने दोन वेळा अटकेपासून तात्पुरता दिलासा दिला होता. आज दिल्ली उच्च न्यायालयात पूजा खेडकरच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे.

पूजा खेडकरने दिल्ली उच्च न्यायालयात रिजॉईंडर दाखल केले आहे. या रिजॉईंडरमध्ये पूजा खेडकरने युपीएससीचे सर्व आरोप फेटाळून लावले असल्याची माहिती मिळत आहे. पूजा खेडकरनं नाव बदलून फसवणूक केल्याचा आरोप UPSCने केला होता. मात्र हे सर्व आरोप पूजा खेडकरने फेटाळून लावले आहेत.

यातच आज दिल्लीत पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी होणार असून या सुनावणीत काय निर्णय होतो हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com